MPSC | English Vocabulary | Idioms on Animals-1 | Lecture 2 [Marathi] - Videos

0
91

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबारोबरच इतरही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना योग्य व विनामूल्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने आम्ही स्पर्धावाहिनी हा youtube channel सुरु केलेला आहे. हि चळवळ अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आपणही सहकार्य करावे हि अपेक्षा. यामध्ये आम्ही प्रत्येक विषयची Lecture Series देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या comments व SUBCRIBCTIONS या कामासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

सध्याचा आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत पाहिल्यास आपणास असे दिसून येते कि ENGLISH या विषावरील विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांपैकी जवळपास निम्मे प्रश्न हे VOCABULARY या घटकावर विचारले जातात. त्यामुळे या घटकाला खूप महत्व आले आहे. मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना हा घटक फार अवघड जातो. कितीही अभ्यास केला तरीही लक्षात राहण्यास कठीण असणारा ENGLISH VOCABULARY हा घटक या Lecture Series च्या माध्यमातून अधिक सोपा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या Lecture Series मध्ये आम्ही तुम्हाला दररोज एक विडीओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये साधारण १५ ते २० शब्द cover करण्याचा प्रयत्न असेल

या Lecture Series ची सुरवात आपण IDIOMS हा घटक घेऊन करत आहोत. यामध्ये आम्ही IDIOMS हा घटक BIRDS, ANIMALS, NATURE, OBJECT, PERSON अशा वेगवेगळ्या गटात विभागून त्यांच्या origins किंवा चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामूळे तुम्हाला त्या IDIOMS लक्षात ठेवणे सोपे जाईल.

हा विडीओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. या Lectures चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हि अपेक्षा …..

Other VIDEOS …..

#MPSC | English Vocabulary | Lecture 1 | Idioms on Birds [Marathi]

धन्यवाद
स्पर्धावाहिनी

source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here